मुंबई : तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.
कसं तपासाला तुमच्या मोबाईल बॅटरीचं आरोग्य?
लिथियमची बॅटरी प्रत्येक चार्जनंतर हळू-हळू कमजोर होत असते, जसं जशी बॅटरी थोडीशी फुगायला लागते, समजा तुमच्या बॅटरी हळू हळू जीव सोडतेय.
जेव्हा बॅटरी सपाटपृष्ठभागावर गोल फिरते
सपाट जागेवर जेव्हा तुमची फोनची बॅटरी सहज गोल फिरत असेल तेव्हा समजा बॅटरी गेलीय.
जर तुमच्या फोनच्या बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल, तर थोडं लक्ष द्या, जर तुमच्या बॅटरीची चार्जिंग झटपट उतरत असेल, तर समजा तुमच्या फोनच्या बॅटरीचा शेवटची घटका आली आहे.
हा नंबर डायल करा
अँड्राईड फोन वापरणाऱ्यांनी जर *#*#4636#*#* हा नंबर डायल केला, तर त्यांना आपल्या फोनच्या बॅटरीचं नेमकं आरोग्य लक्षात येणार आहे. हा नंबर डायल केल्यानंतर तुम्ही सर्व्हिस मेनूमध्ये जाल, तेथे तुम्हाला बॅटरीची नेमकी परिस्थिती समजेल.
बॅटरी मॉनेटरिंग अॅप
जर हा नंबर तुमच्या फोनवर डायल केल्यानंतर काहीही होत नसेल, तर गुगल प्ले स्टोरमधून बॅटरी डाऊनलोड करा, हे बॅटरी मॉनिटरिंग अॅप आहे, जे तुम्हाला बॅटरीबद्दल सर्व माहिती देत राहणार आहे, व्होल्टेजपासून अगदी तापमानापर्यंत.
एक वर्ष चालवल्यानंतर बॅटरीवर लक्ष ठेवा, वर्षभरानंतर ती आणखी चपटी होत जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.