दिल्ली वाहतूक पोलिसांनी सुरू केली ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन!

दिल्ली वाहतूक पोलिसांनी ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन सुरू केलीय. ज्यावर दिल्लीतील स्थानिक रहिवासी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, अनधिकृत पार्किंग, बिघडलेली सिग्नल यंत्रणा आणि अशा इतर समस्यांची ऑडिओ व्हिज्युअल तक्रार पाठवू शकतील. 

Updated: Oct 18, 2014, 11:20 AM IST
दिल्ली वाहतूक पोलिसांनी सुरू केली ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन! title=

नवी दिल्ली: दिल्ली वाहतूक पोलिसांनी ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन सुरू केलीय. ज्यावर दिल्लीतील स्थानिक रहिवासी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, अनधिकृत पार्किंग, बिघडलेली सिग्नल यंत्रणा आणि अशा इतर समस्यांची ऑडिओ व्हिज्युअल तक्रार पाठवू शकतील. 

फेसबुकवर दोन लाख फॉलोअर असलेल्या दिल्ली पोलिसांनी जनतेशी अजून चांगल्या पद्धतीनं जोडण्यासाठी प्रयत्न करत ‘व्हॉट्स अॅप’ हेल्पलाईन नंबर ८७५०८७१४९३ सुरु केलाय. 

स्पेशल पोलीस कमिश्नर (वाहतूक) मुक्तेश चंद्रनं सांगितलं, “दिल्ली वाहतूक पोलीस व्हॉट्स अॅपवर दिल्लीकरांशी जोडून खूश आहोत. जर आपण वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, अनाधिकृत पार्किंग, ऑटो, टॅक्सी चालकाद्वारे अधिक पैसे घेणं, प्रवाशांना घेऊन जाण्यास नकार देणं, दुर्व्यवहार करणं, खराब वाहतूक सिग्नल किंवा वाहतूकी संबंधी कोणतीही समस्येबाबत तक्रार करू इच्छिता तर तुम्ही व्हाट्स अॅप द्वारे मोबाईल नंबर ८७५०८७१४९३ आपलं नाव, स्थळ, तारीख, वेळ इत्यादी माहिती सोबत फोटो किंवा व्हिडिओ क्लिप पाठवू शकतो.”

पोलीस कमिश्नर यांनी सांगितलं की, आपल्या प्रत्येक तक्रारीवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं आम्ही आश्वासन देतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.