पुन्हा आला फेसबूकवर कलर चेंज व्हायरस..

तुम्ही फेसबूक युजर आहात? तुम्ही पण तुमच्या फेसबूक प्रोफाइलच्या थीमचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे?  फेसबूक युजर्सला पुन्हा एकदा सावधान होण्याची गरज आहे. कारण पुन्हा एकदा कलर चेंज व्हायरस परतला आहे. या व्हायरसमुळे सुमारे १० हजार पेक्षा अधिक युजर्स प्रभावित झाले आहेत. 

Updated: Aug 8, 2014, 04:12 PM IST
पुन्हा आला फेसबूकवर कलर चेंज व्हायरस.. title=

मुंबई : तुम्ही फेसबूक युजर आहात? तुम्ही पण तुमच्या फेसबूक प्रोफाइलच्या थीमचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला आहे?  फेसबूक युजर्सला पुन्हा एकदा सावधान होण्याची गरज आहे. कारण पुन्हा एकदा कलर चेंज व्हायरस परतला आहे. या व्हायरसमुळे सुमारे १० हजार पेक्षा अधिक युजर्स प्रभावित झाले आहेत. 

 फेसबूकने या व्हायरसला रोखण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार फेसबूकचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे.

कसा शिरतो व्हायरस फेसबूकमध्ये 

हा मालवेअर व्हायरस एका अॅप्लिकेशनच्या जाहिरातीच्या माध्यमातून फेसबूक युजर्सपर्यंत पोहचतो. त्यात सांगितले जाते, की तुम्ही तुमच्या फेसबूक प्रोफाइलचा रंग बदलू शकतात. या अॅप्लिकेशनला डाऊनलोड केल्यानंतर व्हायरस युजरला एका हॅकिंग वेबसाइटवर घेऊन जातो, मग या ठिकाणाहूनच धोका सुरू होतो. 

ही वेबसाईट फेसबूक युजरला रंग बदलण्याचा एक व्हिडिओ दाखवून युजरला फेसबूक पासवर्ड विचारते. या प्रकारे पासवर्ड जाणून हॅकर्स फेसबूक युजर्सच्या मित्रांपर्यंत पोहचतात.  फेसबूक युजर्सने व्हिडिओ पाहिला नाही तर हॅकर्सचा प्रयत्न असतो की युजर इतर वाईट आणि पॉर्न अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे. 

फेसबूक युजर डेस्कटॉपवर असेल तर वेबसाइट युजरला एक पोर्नोग्राफिक व्हिडिओ प्लेअर डाऊनलोड करण्यास सांगते.

एका चायनीज इंटरनेट कंपनीनुसार, ‘जर कोणी फेसबूक युजर अँड्रॉइड डिव्हाइस युज करीत असेल तर ही वेबसाइट इशारा देते की तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे. त्यामुळे त्या व्हायरस काढण्यासाठी दुसरे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याचा सल्ला देतात. 

तुम्ही फेसबूक युजर असाल आणि तुम्ही एखादे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले असेल तर त्याला त्वरित डिलिट करा. तसेच खासगी माहिती जपण्यासाठी  तुम्हांला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.