मुंबई : 'फेसबुक'च्या मदतीनं एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. याच सोशल वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल फोटो आणि अल्बममधले इतर फोटोही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.
तुमचे फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोटोजची सेटींग बदलावी लागेल. फेसबुकनं नुकतंच आपल्या प्रोफाईल पिक्चरच्या जुन्या सेटींगमध्ये बदल केलेत.
आत्तापर्यंत फेसबुकमध्ये कोणत्याही युजरनं अपलोड केलेला प्रोफाईल फोटो दुसरा कोणताही युजर पाहू शकत होता. यामुळेच, या फोटोजच्या चुकीच्या वापराचा धोकाही वाढला होता. कुणीही या फोटोवर कमेंट करू शकत होता, लाईक करू शकत होता.
यामुळे, फेसबुकनं सेटिंगमध्ये बदल करत प्रोफाईल पिक्चर अपलोड करताना क्लिकेबलचा ऑप्शन उपलब्ध करून दिलाय. युजरनं आपला प्रोफाईल फोटो अपलोड केल्यानंतर त्याला सेटिंगमध्ये जाऊन अनक्लिकेबल करणं गरजेचं आहे. त्यामुळे, तुमचा फोटो अनोळखी व्यक्तींना दिसू शकणार नाही.
याशिवाय, फोटो प्रायव्हसी मेन्टेन करण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमचा छोट्या आकारातला फोटो अपलोड करा. त्यामुळे, तुमचे मित्र तुम्हाला ओळखू शकतील पण, तुमच्या फोटोचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही. यासाठी फोटोशॉपमध्ये जाऊन तुमचा फोटो १८०-१८० आकारात क्रॉप करा... आणि हा छोटा फोटो फेसबुकवर अपलोड करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.