जिओनीचा नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' लॉन्च

मोबाईल निर्माता कंपनी जिओनी इंडियानं आपला नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' भारतीय बाजारात उतरवलाय. 

Updated: Sep 30, 2014, 07:43 AM IST
जिओनीचा नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' लॉन्च title=

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी जिओनी इंडियानं आपला नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' भारतीय बाजारात उतरवलाय. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिओनी सीटीआरएल व्ही ४ एस मध्ये १.३ गीगाहर्टझ तसंच अँन्ड्रॉईड ४.४ ओएसचा वापर करण्यात आलाय. यामध्ये १ जीबी रॅम तसंच ८ जीबी मेमरी आहे. 

जिओनी इंडियाचे प्रमुख (स्मार्टफोन) अरविंद वोहरा यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा जिओनीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाजारपेठ ठरलाय. 

भारतात या हँन्डसेटची किंमत आहे ९९९९ रुपये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.