नवी दिल्ली: विमान प्रवासाच्या दरात कपात करण्याचा नवा ट्रेंडच सुरू झालाय. यातच भर टाकत आता गो एअर या विमान कंपनीनं आज काही कालावधीसाठी नवी योजना सुरू केलीय. ज्यात कंपनीच्या नेटवर्कमध्ये एका बाजूनं प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ९९९ रुपये भाडं ठेवलंय.
योजनेअंतर्गत चार महिन्यांमध्ये प्रवास करावा लागेल. योजना तीन दिवसांसाठी आहे, आजपासून सुरू झाली.
वैमानिक कंपनीनं सांगितलं, या योजनेअंतर्गत एकदा घेतलेलं तिकीट परत घेतलं जाणार नाही आणि योजनेसाठी काही ठराविक जागांच उपलब्ध आहेत.
रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की, विमान प्रवास रद्द झाला तर फक्त विमानतळातील टॅक्सच्या रूपात घेतलेले पैसे परत दिले जातील. ही बुकिंग २३ जूनपासून ३१ ऑक्टोबर २०१५पर्यंत असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.