लंडन : नवरा-बायकोची लहान सहान भांडणं सुरूच असतात, पण एका पतीला आपल्या पत्नीने आजरपणात काळजी न घेतल्याचा प्रचंड राग आला, त्याने थेट बायकोचं वेबसाईटवर विक्रीला काढली.
‘इबे’ वेबसाईटवर या माणसाने बायकोची किंमत ५८ लाख रूपयांची बोली लावण्यात आली आहे.
वेबसाईटवर तिच्या लिलावाची किंमत दोनच दिवसांत ५८ लाखांच्या घरात पोहचल्यानंतर नवरा सायमनही चक्रावलाय.
३३ वर्षीय पती सायमनने २७ वर्षीय बायको लिएंड्राचा फोटो इबेवर टाकला. एवढंच नाही त्याने 'यूज्ड वाईफ' असा उच्चार देखील जाहिरातीत केला आहे.
आणखी एक प्रकार म्हणजे, पत्नीच्या विक्रीची कारणं आणि तिला खरेदी करण्याचे फायदे तसंच तोटेही त्याने जाहिरातीत नमूद केले आहेत.
सायमन आणि लिएंड्रा यांना दोन मुलंही आहेत. सायमनने ती चांगलं जेवण बनवते असं देखील म्हटलं आहे. मात्र पत्नी म्हणून समर्पणाची भावना तिच्यात कमी पडत असल्याचं तो म्हणतो.
लिएंड्राला हे समजताच तिला नवऱ्याचा जीव घ्यावासा वाटला.
इबे या वेबसाईटनेही जाहिरात हटवली आहे. आपल्या पत्नीला किती किंमत आहे, लोकांना हसवण्याचा माझा हेतू होता, दुसरा कोणताही वाईट हेतू नाही, असं सायमनने म्हटलं आहे.