नवी दिल्ली : लेईको कंपनीने भारतीय बाजारात नुकताच ले मॅक्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन भारतात ६४ जीबी आणि १२८ जीबी या दोन पर्यांयामध्ये उपलब्ध करण्यात आलाय.
ले मॅक्सच्या ६४जीबीची किंमत ३२ हजार ९९९ रुपये तर १२८ जीबीच्या मॉडेलची किंमत ६९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर १६ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ग्राहकांनी या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन सुरु केलंय. दिवसाला तब्बल एक लाखाहून अधिक जण हा स्मार्टफोन रजिस्टर करतायत.
ले मॅक्स या स्मार्टफोनमध्ये ६.३३ इंचाचा २k डिस्प्ले देण्यात आलाय. याचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास ३ कोटेड आहे. यात २ गिगाहर्टझ ओक्टाकोर प्रोसेसर देण्यात आलाय. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीय. यात सेल्फीसाठी ४ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. तर २१ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा देण्यात आलाय.
यात बॅटरीची क्षमता ३,४०० एमएएच इतकी आहे. ड्युअल सिम व्यतिरिक्त ४जी एलटीई सपोर्ट, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस उपलब्ध आहे.