८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला लेनोवोचा स्मार्टफोन

चायनीज कंपनी लेनोवोने सीईएस २०१६च्या ट्रेड शोच्या आधीच नवा स्मार्टफोन वाइब एस१ लाइट लाँच केलाय. याची किंमत १९९ डॉलर (साधारण १३,२५० रुपये) आहे. मार्च २०१६ पासून या फोनची विक्री सुरु होऊ शकते. फिकट निळा आणि पांढऱ्या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

Updated: Jan 11, 2016, 09:17 AM IST
 ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला लेनोवोचा स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : चायनीज कंपनी लेनोवोने सीईएस २०१६च्या ट्रेड शोच्या आधीच नवा स्मार्टफोन वाइब एस१ लाइट लाँच केलाय. याची किंमत १९९ डॉलर (साधारण १३,२५० रुपये) आहे. मार्च २०१६ पासून या फोनची विक्री सुरु होऊ शकते. फिकट निळा आणि पांढऱ्या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

या स्मार्टफोनमचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे. यात १.३ गिगाहर्टध ओक्टाकोर मीडियाटेक प्रोसेर असून २ जीबी रॅम आहे. हा अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. यात इनबिल्ट स्टोरेज १६ जीबी असून १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. 

या स्मार्टफोनचा रेयर कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे. तसेच फेस डिटेक्शन ऑटोफोकस आणि बीएसआय सेंसरही आहे. 2700mAh बॅटरी क्षमता आहे.