मार्क झुकरबर्ग जातोय सुट्टीवर

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे.

Updated: Nov 21, 2015, 07:04 PM IST
मार्क झुकरबर्ग जातोय सुट्टीवर title=

न्यूयॉर्क : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे.

कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबियांसाठी वेळ देता यावा यासाठी मार्कने सुट्टी घेण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. प्रिसिला आणि मी बाळाच्या आगमनाची तयारी सुरु केली आहे असे मार्कने फेसबुक पोस्टवर लिहिले आहे.

फेसबुकमधील कर्मचा-यांना चार महिन्यांची पॅटर्निटी रजा मिळते.दरम्यान, मार्कच्या अनुपस्थितीत सोशल नेटवर्किंग साईटचे कामकाज कोण सांभाळणार याबाबत मार्कने कोणतीही माहिती दिलेली नाही.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.