अॉफलाईन असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजना रिप्लाय करु शकता

सोशल मीडियामध्ये आघाडीवर असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सससाठी नेहमीच नवेनवे फिचर्स आणत असतो. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी असेच काहीसे वेगळे आणि नवीन फिचर आणले आहे.

Updated: Nov 21, 2015, 12:47 PM IST
अॉफलाईन असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजना रिप्लाय करु शकता title=

नवी दिल्ली : सोशल मीडियामध्ये आघाडीवर असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सससाठी नेहमीच नवेनवे फिचर्स आणत असतो. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी असेच काहीसे वेगळे आणि नवीन फिचर आणले आहे.

याआधी तुम्हाला केवळ ऑनलाइन असतानाच व्हॉव्हॉट्सअॅपवरील मेसेजेना उत्तर देता येत होते. मात्र आता ऑनलाइन न दिसताही तुम्ही मेसेजना रिप्लाय देऊ शकता. 'क्विक रिप्लाय' हा नवा पर्याय व्हॉट्सअॅपने आणलाय.

यात तुम्ही नोटिफिकेशनवरील मेसेजना तात्काळ उत्तर देऊ शकता तेही ऑनलाइन न दिसता. तसेच जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप पाहिला होतात तेव्हाचाच लास्ट सीन समोरच्या व्यक्तीला दिसेल. त्यामुळे आवश्यक रिप्लायही देता येईल आणि समोरच्या व्यक्तीला आपण ऑनलाइन आहोत हे ही दिसणार नाही. 

उदाहरणार्थ, तुमच्या मित्राचा तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज आलाय आणि तुम्ही त्याला क्विक रिप्लायने उत्तर दिले तर तुम्ही त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुनही ऑनलाइन दिसणार नाहीत. तसेच तुमचा लास्ट सीनही बदलणार नाही. सध्या हे फिचर्स केवळ आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.