किती जणांना I Love You म्हटलंय आपण?

 जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.

Updated: Jul 15, 2015, 04:01 PM IST
किती जणांना I Love You म्हटलंय आपण? title=

मुंबई:  जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एका व्यक्तीनं कमीत कमी तिघांना आय लव्ह यू म्हटलेलं असतं, असा निष्कर्ष निघालाय. YouGov चा सर्व्हे आहे, त्यानुसार अमेरिकेत जेव्हा १ हजार जणांना विचारलं गेलं. तेव्हा हे सत्य पुढे आलं. संशोधनांत सांगण्यात आलंय की, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात तीन किंवा अधिक नात्यांमध्ये असतो आणि हे सर्व अनेक काळ टिकलेले नाते असतात.

अभ्यासात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय की, हे नाते कितीवेळेपर्यंत होतं आणि किती गंभीर होते हे सांगितलं नाही. पण अभ्यासात सांगितलंय की, सामान्यपणे एक व्यक्ती तिघांना हे मॅजिकल वर्ड्स म्हणतो.

इंटरनेट सर्व्हेवर जवळपास १००० अमेरिकी लोकांना प्रश्न विचारले गेले. हे सर्व वयवर्ष १८ ते ६५ दरम्यान होते. या सर्वांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर आपण किती जणांना हे मॅजिकल वर्ड्स म्हटले हे सांगितलंय.

जास्तीतजास्त लोकांनी तिघांना आय लव्ह यू म्हटल्याचं पुढे आलं. या सर्व्हेत आणखीही एक महत्त्वाची बाब पुढे आली ती म्हणजे, जवळपास ३६ टक्के महिला आपलं जुनं अफेअर असलेल्या व्यक्तीच्या किंवा प्रियकराच्या संपर्कात असतात. तर ५२ टक्के पुरुष आपलं जुनं प्रेम विसरू शकत नाहीत.

३२ टक्के लोकांचा तीन पैकी एकच नातं जास्त काळ टिकलं. तर दोन वेळा प्रेमात पडणाऱ्यांची संख्या २९ टक्के होती. १५ टक्के जणांचं म्हणणं होतं की ते तीन वेळा प्रेमात पडले. 

या सर्व्हेतून हे आय लव्ह यू कोणत्या भावनेतून म्हटलं गेलं याची प्रामाणिकता मात्र सिद्ध करता येऊ शकत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.