भेटा एक देशी जिगोलो ट्रेनरला

आपल्या कानावर, किंवा चर्चेत अनेक गोष्टी येत असतात, त्यापैकी काही विश्वास न ठेवण्यासारख्या असतात, कारण त्याविषयी आपण फक्त ऐकलेलं असतं. पण अशा गोष्टी नक्कीच नजरेआड करण्यासारख्याही नसतात, जे समाजात कुठेतरी घडतंय, त्यावर अनेक समज, गैरसमज आहेत, त्याविषयीच बोललाय एक जिगोलो.

Updated: Aug 31, 2015, 04:39 PM IST
भेटा एक देशी जिगोलो ट्रेनरला title=

मुंबई : आपल्या कानावर, किंवा चर्चेत अनेक गोष्टी येत असतात, त्यापैकी काही विश्वास न ठेवण्यासारख्या असतात, कारण त्याविषयी आपण फक्त ऐकलेलं असतं. पण अशा गोष्टी नक्कीच नजरेआड करण्यासारख्याही नसतात, जे समाजात कुठेतरी घडतंय, त्यावर अनेक समज, गैरसमज आहेत, त्याविषयीच बोललाय एक जिगोलो.

जिगोलोशी ओळख
एका इंजीनियरची विमानात एका व्यक्तीशी ओळख झाली. प्रवासादरम्यान त्याने सहज विचारलं, तुम्ही नेमकं काय करतात, आणि त्या व्यक्तीने सहजच सांगून टाकलं जिगोलो.

प्रवास संपल्यानंतर साहित्य घेण्याच्या काऊंटवर, त्या इंजीनियरने त्या व्यक्तीला आपला फोन नंबर दिला, आणि फोन करण्यास सांगितलं.

जिगोला यावर म्हणाला, "मला नंतर कळलं की तो माणूस त्याच्या पत्नीसाठी सेवा घेऊ इच्छित होता, काही दिवसांनी  त्या इंजीनियरच्या पत्नीने मला तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे पाठवलं, अशी साखळी वाढत गेली. नेहमी एक क्लायंट मला दुसऱ्या क्लायंटकडे पोहोचवत होता, माझं कॅलेंडर अप्वाइंटमेंटने भरून गेलं".

या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे, आता या माणसाने आपली ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे, हा व्यक्ती फक्त ईमेलने तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो, तो भारतात जिगोलो ट्रेनर आहे.

जिगोलो या विषयावर अनेक मिथ्स, गैरसमज 

हा व्यक्ती जिगोलोशी संबंधित मिथ्स आणि गैरसमज दूर करतांना सांगतो, "जिगोलो दिसायला सुंदर असलाच पाहिजे असं काहीही नाही, मात्र ज्याला जिगोलोचं आयुष्य जगायचं आहे, त्याची भाषा चांगली असावी, तो समझदार असावा, पण असं तयार होणं फार कठीण असतं".

जिगोलो ट्रेनर पुढे म्हणतो, "जास्तच जास्त लोक असा विचार करतात की, जिगोलो म्हणजे पुरूष सेक्स वर्कर, ज्यांना महिला पैसे देऊन बोलवतात, पण काही बाबींपर्यंत हे सत्य आहे".

जिगोलो असं सांगत असतांना हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो की, कोणती बाब यशस्वी जिगोलो बनण्यासाठी महत्वाची आहे.

जिगोलो म्हणतो, "या व्यवसायात सेक्स म्हणजे सर्व काही नाही. तर पसंती-नापसंतीच्या या कठीण जाळ्यात, प्रेम आणि आपलेपणा समजून घेण्याचा हा पेशा आहे'.

कोण असतात बहुतांश क्लायंट
हा जिगोलो ट्रेनर म्हणतो, "ग्राहकांमध्ये घरगुती, आणि प्रोफेशनल महिला, परदेशी दुतावासाचे कर्मचारी, एनआरआय आणि टुरिस्ट, कॉलेज स्टुडंट आहेत. मात्र हे ग्राहक वयाने १८ वर्षांपेक्षा मोठे असले पाहिजेत.

जिगोलोने स्वत:ला यासाठी तयार केलं पाहिजे, तेव्हाच त्याला काम मिळण्याची अपेक्षा असते. जिगोलोला ग्राहक अनेक माध्यमांचा वापर करून धुंडाळतात, त्यात नव्याने व्हॉटस अॅपचाही समावेश आहे. सर्व काही गोपनीय असतं, काहीही लिक केलं जात नाही.

तो चालवतो जिगोलो ट्रेनिंग नावाची वेबसाईट
"मी काही जास्त सुंदर नव्हतो, मी एक पुस्तकी किडा होतो. सामाजिक सहभाग कमीच होता, पण एकटा राहत होतो, गर्लफ्रेन्ड नव्हती. मात्र एक जिगोलो होण्याचं स्वप्न मला खूपच आकर्षित करत होतं. मात्र हा माझ्यासाठी तेव्हा एक सापळा असावा, ज्यातून मी आता परत येऊ शकत नाही".

"काही लोकांकडे मर्दानी गोष्टी दाखवण्याची कला असते, सोबत बोलण्याची पद्धत, प्रेम करण्यासाठी आणि स्वत:चा प्रचार करण्याचंही एक तंत्र असतं".

तो म्हणतो, "ट्रेनिंगसाठी सर्वांनाच घेतलं जात नाही, बोटावर मोजण्या इतकेच यासाठी योग्य असतात, यात जास्तच जास्त लोक नोकरी करणारे असतात, मी देखील नोकरी करणारा होतो, जर अशा लोकांना ज्यांना मी यासाठी ट्रेन केलं आहे, ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले तर ते इतर लोकांपेक्षा वेगळे दिसणार नाहीत, पण अधिक सेक्सूअल दिसतात."

जिगोलो आपल्या क्लायंटला कधीच नाही म्हणू शकत नाही
जिगोलो या विषयावर अधिक खुलेपणाने आणि विषयाच्या खोलीपर्यंत जात असतांना म्हणतो, "ज्यांनी आपली मानसिक तयारी अधिक व्यवस्थित केली आहे, ते आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या महिलांना आपली सेवा देतांना कधीच नाही म्हणू शकत नाही, एका रात्रीत ते ३० हजार रूपयांपर्यंत मिळवतात. दुसरीकडे हजार रूपयातही जिगोलो मिळतात आणि प्रत्येक जिगोलोला काम मिळेलच असंही नाही".

जिगोलोविषयी आणखी एक गैरसमज
आणखी एक गैरसमज दूर करतांना जिगोलो ट्रेनर म्हणतो, "अनेक जणांना असंच वाटतं, महिलांना सेक्ससाठी पैसे देण्याची काय गरज, त्यांनी विचार केला तर त्यांच्यासाठी हे सहज उपलब्ध करता येईल, असा अनेकांचा गैरसमज आहे, मात्र असं करणं महिलांसाठी सुरक्षित नाही, ब्लॅकमेलचीही मोठी भीती असते. काही विवाहित महिला अशा असतात, ज्या आपलं चांगलं जीवन वाया घालवू इच्छीत नाहीत. माझ्या क्लायंट मोठ्या व्यवसायात आणि मोठ्या पदावर आहेत, त्यांच्याशी माझी मैत्रिही होते. मात्र मध्यमवर्गीय महिला या जिगोलोच्या संपर्कात नसल्यातच जमा आहे."

शेवटचा काळ तसा सर्वात वाईट

उलट महिला सेक्सवर्करना समाज नको त्या नजरेने पाहतो, तसं जिगोलोच्या बाबतीत होतांना दिसत नाही, मात्र म्हातारपणाचा जिगोलोचा शेवटचा काळ तेवढाच वाईटही असतो, असंही जिगोलो शेवटी स्पष्ट करतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.