नेमक्या किती मुली आहेत या फोटोत? ओळखा पाहू...

सोशल मीडियावर एक फोटो सध्या वायरल होताना दिसतोय... लोकांना कन्फ्युज करण्यासाठीच हा फोटो शेअर केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

Updated: Mar 19, 2016, 09:20 AM IST
नेमक्या किती मुली आहेत या फोटोत? ओळखा पाहू... title=
सौ. इन्स्टाग्राम

लंडन : सोशल मीडियावर एक फोटो सध्या वायरल होताना दिसतोय... लोकांना कन्फ्युज करण्यासाठीच हा फोटो शेअर केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

या फोटोमध्ये तुम्हाला काही मुली दिसतील... या फोटोत नेमक्या किती मुली आहेत हे तुम्हाला ओळखून दाखवायचंय. हा फोटो स्वित्झरलँडचा एक फोटोग्राफर टिजियाना वेरगारीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. 

फोटोमागचं सत्य...

या फोटोत १३ मुली बसलेल्या दिसत असल्या तरी खरं म्हणजे हा केवळ दोन मुलींचा फोटो आहे. याला तुम्ही माईंड गुगलीही म्हणू शकता. पहिली आणि दुसरी मुलगी एका आरशासमोर बसलेल्या आहेत... आणि त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या आजुबाजुला असलेल्या आरशांत दिसत आहे.