मोटोचा नवा जबरदस्त वॉटरप्रूफ स्मार्टफोन

मोटोरोलाने नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरविलाय. हा बहुप्रतीक्षित ‘मोटो जी टर्बो’ स्मार्टफोन लॉन्च झालाय. १४ हजार ४९९ रुपये किंमत असणाऱ्या या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु झाली. 

Updated: Dec 10, 2015, 11:06 PM IST
मोटोचा नवा जबरदस्त वॉटरप्रूफ स्मार्टफोन  title=

न्यूयॉर्क : मोटोरोलाने नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरविलाय. हा बहुप्रतीक्षित ‘मोटो जी टर्बो’ स्मार्टफोन लॉन्च झालाय. १४ हजार ४९९ रुपये किंमत असणाऱ्या या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु झाली. 

मोटोरोलाने इतर स्मार्टफोनप्रमाणे ‘मोटो जी टर्बो’ हा स्मार्टफोनही फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध केलाय. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन काळा आणि पांढरा या दोन रंगांमध्ये आहे.

काय आहे यात?
५ इंचाचा एचडी डिस्प्ले (७२० ×१२८० पिक्सेल रिझोल्युशन)
६४ कॉर्निंग गोरिल्ला ३ प्रोटेक्शन
स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर
२ GB रॅम
अँड्रॉईड लॉलिपॉप ५.१.१ ऑपरेटिंग सिस्टम
१६ GB इंटरनल मेमरी
मायक्रो एसडीच्या सहाय्याने ३२ GB पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
१३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
५  मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
LED फ्लॅश आणि  ब्लूटूथ
3G आणि 4G कनेक्टिव्हिटी
GPS : मायक्रो USB

मोटोरोलाच्या ‘मोटो जी टर्बो’ला २४७० mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे जलद चार्जिंग सपोर्ट असून सेल्स पॅकसोबत टर्बो पॉवर चार्जर देण्यात आला आहे. टर्बो बॅटरी १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तब्बल ६ तासांचे बॅटरी बॅकअप मिळते. तसेच ‘मोटो जी टर्बो’ हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे. तो पाण्याता ३० मिनिटांपर्यंत राहू शकतो. या स्मार्टफोनचे वजन १५५  ग्रॅम आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.