मुंबई : सोशल मीडियामध्ये सध्याच्या आघाडीला असणाऱ्या व्हॉटसअॅपने आता आपल्या युजर्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिलेय.
व्हॉटसअॅपने अपडेट होत युजर्ससाठी चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न केलाय. व्हॉटसअॅप आता नव्याने अपडेट झालेय. व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनमध्ये युजर्सना वर्ड फाईलप्रमाणे विशिष्ट अक्षराला किंवा वाक्याला बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राईकथ्रू करता येणार आहे.
शब्दाच्या सुरूवातीला आणि अखेरीस * हे चिन्ह (asterisk) टाकून शब्द किंवा वाक्य बोल्ड करता येईल. याशिवाय, अक्षरांच्या मागेपुढे _(अंडरस्कोअर) टाईप केल्यास संबंधित वाक्य इटॅलिकमध्ये दिसेल. तसेच ~ (टिल्ड) हे चिन्ह वापरून अक्षरांना स्ट्राईकथ्रू इफेक्ट देता येऊ शकणार आहे.
मात्र, तुम्हाला यासाठी नवे फिचर्स व्हॉट्सअॅपच्या २.२.५३५ या व्हर्जनमध्ये उपलब्ध असतील. त्यामुळे व्हॉट्सअॅपला अपडेट मारा.