व्हॉट्सअॅप मेसेज सेव्ह करणे झाले आता सोपे

दरवेळी फीचर्समध्ये नवनवीन व्हरायटी देणाऱ्या व्हॉट्सअॅपने स्मार्टफोन युझर्ससाठी आणखी नवीन अपडेट आणलेय. व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टार मेसेज, लिंकसह थंबनेल हे ऑप्शन देण्यात आले आहेत.

Updated: Nov 26, 2015, 05:51 PM IST
व्हॉट्सअॅप मेसेज सेव्ह करणे झाले आता सोपे title=

नवी दिल्ली : दरवेळी फीचर्समध्ये नवनवीन व्हरायटी देणाऱ्या व्हॉट्सअॅपने स्मार्टफोन युझर्ससाठी आणखी नवीन अपडेट आणलेय. व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टार मेसेज, लिंकसह थंबनेल हे ऑप्शन देण्यात आले आहेत.

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे २.१२.३६७ हे व्हर्जन अपडेट करणे गरजेचे आहे. तुम्हाला एखादा मेसेज सेव्ह करायचा आणि नंतर वाचायचा आहे तर तुम्ही त्या मेसेजला स्टार करु शकता.

आणखी वाचा - व्हॉट्सअॅप फोटो कसे हाईड कराल?

 एखाद्या मेसेजला तुम्हाल सेव्ह करायचे आहे तर त्यावर खूपवेळ टॅप केल्यानंतर स्टार ऑप्शनमध्ये तुम्ही तो मेसेज सेव्ह करु शकता. त्यानंतर टूल बारमध्ये स्टार फोल्डरमध्ये तुम्ही तो मेसेज वाचू शकता. ज्याप्रमाणे ईमेलमध्ये बुकमार्क असतो त्याचप्रमाणे हे फीचर आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.