पाकिस्तानी मुलींनी गायलं बीबरचं गाणं, व्हिडिओ वायरल

लाहोरच्या दोन बहिणी सानिया आणि मुक्कदस तबायदारला इंग्रजी येत नाही. मात्र दोन्ही बहिणी जेव्हा पॉप स्टार बीबरचं इंग्रजी गाणं गातात तेव्हा आसपास गर्दी जमा होते. १३ वर्षीय मुक्कदस आणि १५ वर्षीय सानिया बीबरचं गाणं गाऊन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Updated: Apr 2, 2015, 02:15 PM IST
पाकिस्तानी मुलींनी गायलं बीबरचं गाणं, व्हिडिओ वायरल title=

लाहोर: लाहोरच्या दोन बहिणी सानिया आणि मुक्कदस तबायदारला इंग्रजी येत नाही. मात्र दोन्ही बहिणी जेव्हा पॉप स्टार बीबरचं इंग्रजी गाणं गातात तेव्हा आसपास गर्दी जमा होते. १३ वर्षीय मुक्कदस आणि १५ वर्षीय सानिया बीबरचं गाणं गाऊन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.

या दोन्ही बहिणींनी बीबरचं प्रसिद्ध गाणं 'बेबी' अगदी त्याच्याच पद्धतीनं गायलं आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. विशेष म्हणजे त्यांची आई शहनाज सुद्धा गाण्याला ताल देत मुलींना साथ देतांना दिसली. सानिया आणि मुक्कदसला इंग्रजी येत नाही म्हणून बीबरच्या इंग्रजी गाण्याचे बोल पहिले उर्दूमध्ये लिहून मग त्यांनी रियाज केला. या दोघींना पाकिस्तानमध्ये 'जस्टिन बीबी' हे नाव मिळालंय.

सानिया म्हणते, 'आम्ही अनेक वर्षांपासून गाणं गातोय, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य गातात. आम्ही प्रत्येक प्रकारचं पाकिस्तानी आणि बॉलिवूड गाणं गातो. मात्र आम्हाला जस्टिन बीबरच्या गाण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. कारण ती आमच्या मनाला भावते.' 

सानिया पुढे म्हणते, जेव्हा आम्ही बीबरचं 'बेबी' हे गाणं ऐकलं. तर आम्ही डांस करणं सुरू केलं. त्यावेळी आपली शुद्ध हरपून बसलो. मुक्कदस म्हणते की, हे गाणं त्यांच्यासाठी खूप लकी आहे. कारण या गाण्यामुळं त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.