खुशखबर: स्मार्टफोनच्या किमती 11 टक्क्यांनी कमी होणार

तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचाय तर मग एक आनंदाची बातमी आहे. भारतात स्मार्टफोनच्या किमतीत 11 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 18, 2015, 02:22 PM IST
खुशखबर: स्मार्टफोनच्या किमती 11 टक्क्यांनी कमी होणार title=

मुंबई: तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचाय तर मग एक आनंदाची बातमी आहे. भारतात स्मार्टफोनच्या किमतीत 11 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

स्मार्टफोन रिसर्च कंपनी Gfkनं सांगितलं, भारतात स्मार्टफोन युजर्सची मोठी बाजारपेठ आहे. 2015 सालमधील स्मार्टफोन विक्री आणि किमतीकडे बघितल्यास भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत चांगलीच वाढ झालीय. आता भारतात 4G सुरू होतंय. 2015च्या सेंकड हाल्फमध्ये 4जी जगातील 50 टक्के मार्केट काबीज करेल, अशी आशा आहे. 

सध्या विविध स्मार्टफोन कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धा आणि मार्केटमध्ये उपल्बध असलेले ऑप्शन हे फोनच्या किमती कमी होण्यामागचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.