हे आहेत ५ वॉटर रेझिस्टंट फोन

पावसापासून स्मार्टफोनचा बचाव करण्यासाठी आपण विविध आयडिया वापरतो. मात्र पावसाळ्यात जर नवीन फोन घ्यायचाच असेल तर वॉटर रेझिस्टंट स्मार्टफोनला अधिक पसंती मिळते. 

Updated: Jul 21, 2016, 01:18 PM IST
हे आहेत ५ वॉटर रेझिस्टंट फोन title=

मुंबई : पावसापासून स्मार्टफोनचा बचाव करण्यासाठी आपण विविध आयडिया वापरतो. मात्र पावसाळ्यात जर नवीन फोन घ्यायचाच असेल तर वॉटर रेझिस्टंट स्मार्टफोनला अधिक पसंती मिळते. 

सॅमसंग गॅलॅक्सी एस७ - या वॉटर रेझिस्टंट स्मार्टफोनची किंमत ४८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ३० मिनिटे हा स्मार्टफोन पाण्यात राहिल्यानंतरही फोन सुस्थितीत राहील.

सॅमसंग गॅलॅक्सी एस७ एज - या स्मार्टफोनची किंमत ५१ हजार ५०० रुपये इतकी आहे. 

मोटोरोला मोटो जी४ - हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट असून या स्मार्टफोनची किंमत आहे १२ हजार ४९९ रुपये.

मोटोरोला मोटो जी४ प्लस - मोटोरोला मोटोरोला मोटो जी४ प्रमाणेच हा स्मार्टफोनही वॉटर रेझिस्टंट आहे. या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ४९९ इतकी आहे.

सोनी एक्सपिरिया एक्स - सोनीचा हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट असून या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार ९९० रुपये इतकी आहे.