व्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...

लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर... 

Updated: Jul 12, 2016, 03:31 PM IST
व्हिडिओ : पत्नीसोबत फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार निसटला आणि...

मुंबई : लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो... पण, याच दिवशी तुम्हाला ओशाळून टाकणारी एखादी घटना घडली.... आणि तीही सर्वांदेखत तर... 

एका शीख विवाहात एक अशीच घटना घडली... की नवरदेव सर्वांदेखत लाजेनं चूर झाला... आणि सगळ्या वऱ्हाडाला खसखसून हसण्यासाठी कारणदेखील मिळालं. 

आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत सात फेरे घेतानाच नवरदेवाचा चुडीदार कंबरेतून निसटला... नवरदेवाच्या हे तात्काळ लक्षात आलं पण, आपला चुडीदार सावरता सावरता एवढ्या लोकांसमोर मात्र त्याचं चांगलं हसं झालं... 

महत्त्वाचं म्हणजे, नेमका हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला... आणि आता सध्या तो सोशल मीडियावर व्हायरलही होतोय...