नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईट ट्वीटरची अक्षरमर्यादा 140 वरुन दहा हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्याची मर्यादा ही नेटिझन्सवर बंधन घालणारी आहे.
विचार मांडण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी अधिक जागेची गरज गेल्या अऩेक दिवसांपासून व्यक्त होतेय. त्याचा विचार करून मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. मात्र मुख्य वॉलवर पहिले १४० शब्दच दिसतील आणि संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी नव्या पेजवर जावं लागेल.
त्यामुळे ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या नेटीझन्सना दिलासा मिळणार असला, तरी मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया म्हणून ट्विटरचा यूएसपी यामुळे पुसला जाण्याची शक्यता आहे. या भीतीपोटीच मर्यादावाढीच्या वृत्तानंतर ट्विटरचा शेअर कमालीचा पडलाय.