मुंबई: व्हिडिओकॉन मोबाईल फोन्सनं देशात आतापर्यंतचा त्यांचा सर्वात प्रगत स्मार्टफोन 'इनफीनियम ग्रेफाइट' लॉन्च केलाय. इंटेलिजंट सेन्सनं हा फोन परिपूर्ण आहे. हे फीचर आपल्या गरजेनुसार आपला फोन सेट करेल.
फोन व्यक्तीच्या कानाच्या किती जवळ आहे, याचा अंदाज घेऊन इंटेलिजेंट सेन्स, 'ऑटो अॅनसर' सुरू करेल आणि फोन कानाच्या अगदी जवळ असेल तेव्हा ऑटो अॅनसर स्वत:हून बंद होईल.
कंपनीच्या प्रकाशनानुसार फोनमध्ये जीवंत फोटो, फेस ब्यूटी, पॅनोरमा सारखी वैशिष्ट्य आहेत. तसंच प्रगत असं सुरक्षेचं फीचर जसे वी. सिक्योर आणि वी. सेफ सॉस अॅप सारखे फीचर्स संकटकाळी आपण कुठे आहात, त्या जागेची माहिती देण्यात मदत करेल. शिवाय त्याबाबतची एसएमएस आणि अधिसूचनाही पाठवेल.
फीचर्स
कंपनीनं 1.3 गीगाहर्त्ज क्वाडकोर प्रोसेसर, 1.5 जीबी रॅम, 8 मेगा पिक्सेल बॅक आणि 5 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच 4.7 इंच स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन अवघ्या 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.