'अॅपल'नं केला जगातील सर्वात सडपातळ टॅबलेट लॉन्च!

अॅपलनं गुरुवारी दोन नवे टॅबलेट ‘आयपॅड एअर २’ आणि ‘आयपॅड मिनी ३’ लॉन्च केलेत. महत्त्वाचं म्हणजे, आयपॅड एअर २ हा जगातला सर्वात सडपातळ टॅबलेट ठरलाय.

Updated: Oct 17, 2014, 09:16 AM IST
'अॅपल'नं केला जगातील सर्वात सडपातळ टॅबलेट लॉन्च! title=

कॅलिफोर्निया : अॅपलनं गुरुवारी दोन नवे टॅबलेट ‘आयपॅड एअर २’ आणि ‘आयपॅड मिनी ३’ लॉन्च केलेत. महत्त्वाचं म्हणजे, आयपॅड एअर २ हा जगातला सर्वात सडपातळ टॅबलेट ठरलाय.

‘अॅपल’नं चुकून बुधवारीच ‘आयपॅड एअर २’ आणि ‘आयपॅड मिनी ३’ यूजरगाईडचा स्क्रीनशॉट आयट्यून्स स्टोअरवर जाहीर केला होता. 

आयपॅड एअर २ ची जाडी आहे केवळ ६.१ मिमी आणि वजन आहे ४३७ ग्रॅम... तर याची स्क्रीन साईज आहे ९.७ इंच... हा ‘आयपॅड एअर’पेक्षा १८ टक्के सडपातळ आहे. तसंच हा जगातला सर्वात सर्वात सडपातळ ठरलाय, अशी माहिती अॅपलचे सीआय टीम कूक यांनी दिलीय. यामध्ये विशेष पद्धतीची A8X चिप देण्यात आलीय जी आयपॅड एअरच्या तुलनेत सीपीयू परफॉर्मन्स ४० टक्के तर ग्राफिक परफॉर्मन्स २.५ टक्के वाढवते. 

याशिवाय १० तासांचा बॅटरी टाईम यामध्ये मिळतो. ८०२.११ac वाय-फायमुळे यामध्ये चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी M8 मोशन को-प्रोसेसर यात देण्यात आलाय. 

दरम्यान, आयपॅड मिनी ३ गोल्ड, सिल्व्हर आणि स्पेस ग्रे रंगात उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीनं दिलीय.  

 


अॅपल

टॅबलेटची वैशिष्ट्ये... 
- अॅपलच्या या नव्या आयपॅडची स्क्रीन आहे ९.७ इंच
- यामध्ये ६४ बिट, ए-८ एक्स, एम-८ मोशनचा प्रोसेसर उपलब्ध करून देण्यात आलाय. 
- यामध्ये, ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे.
- तर १.६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 
- १६ जीबीपासून १२८ जीबी मेमरी ऑप्शन्स या टॅबलेटसोबत मिळतील. 
- याशिवाय, टच आयडी, फेसटाईम एचडी कॅमेरा, टाईम लॅप्स, पॅनोरमा, स्लो-मोशन, फोर जी आणि बर्स्ट फोटो मोड सारखे ऑप्शन्स पहिल्यांदाच अॅपलच्या या आयपॅडमध्ये जोडण्यात आलेत.  
- दोन्ही टॅबलेटमध्ये आयडी फिंगरप्रिंट सेन्सर असल्यानं युजर्स आपल्या फिंगरप्रिंटनं अनलॉक करू शकतील.  

सध्याची किंमत 
हे दोन्ही आयपॅड १६, ६४ आणि १२८ जीबी मेमरीसोबत याच महिन्यात मार्केटमध्ये दाखल होतील. अमेरिकेत या टॅबलेटची सध्याची किंमत  ३१,००० रुपयांपासून ४३,००० पर्यंत निर्धारित करण्यात आलीय.

आयपॅड एअर २ वाय-फाय मॉडलसोबत भारतात १६ जीबी व्हर्जन ३५,९०० रुपये, ६४ जीबी ४२,९०० रुपये आणि १२८ जीबी ४९,९०० रुपयांत उपलब्ध होईल.
तर आयपॅड एअर २ ची किंमत वाय-फाय आणि सेल्युलर मॉडलसोबत १६ जीबीसाठी ४५,९०० रुपये, ६४ जीबीसाठी ५२,९०० आणि १२८ जीबीसाटी ५९,९०० रुपये असेल.  

तर ‘आयपॅड मिनी ३’च्या वाय-फाय मॉडलच्या - १६ जीबीसाठी २८,९०० रुपये, ६४ जीबीसाठी ३५,९०० रुपये आणि १२८ जीबीसाठी ४२,९०० रुपये मोजावे लागतील. तसंच याच टॅबलेटचं वायफाय आणि सेल्युलर मॉडल १६ जीबीसाठी ३८,९०० रुपये, ६४ जीबी ४५,९०० रुपये आणि १२८ जीबी ५२,९०० रुपयांत उपलब्ध होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.