CCTVमध्ये 'फिरणारं भूत', बंद दरवाज्यातून ये-जा खेळ चाले'

 यूट्यूबवर एक व्हिडिओ १२ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला. तो भूताचा किंवा एखाद्या रहस्यमयी व्हिडिओ अनेकांची भंबेरी उडविणारा आहे. 

Updated: Apr 13, 2016, 07:37 PM IST
CCTVमध्ये 'फिरणारं भूत', बंद दरवाज्यातून ये-जा खेळ चाले' title=

नवी दिल्ली :  यूट्यूबवर एक व्हिडिओ १२ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला. तो भूताचा किंवा एखाद्या रहस्यमयी व्हिडिओ अनेकांची भंबेरी उडविणारा आहे. 

व्हिडिओमधील व्यक्तीने काळ्या रंगाचे हुड घातले आहे. हा व्यक्ती थोड्या अंतराने बंद दरवाजा असताना ये-जा करतो.  तो ये जा करत असताना दरवाजा पूर्णपण बंद असतो. त्याने हे कसे केले हे समजण्याच्या पलीकडे आहे. 

हा व्हिडिओ एक दुकानातील आहे. यात दोन व्यक्ती झोपलेले दिसत आहे. तर एक रहस्यमय व्यक्ती दुकानात येतो आणि पुन्हा बाहेर जातो. तो बाहेर जातो तेव्हा एक प्रकाश पडतो. 

झोपलेले व्यक्तीही त्याला अधूनमधून उठून पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. युट्यूबवर अनेक जण याला फेक व्हिडिओ किंवा रहस्यमय व्हिडिओ म्हणत आहेत. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. दरम्यान यूट्यूबने या व्हिडिओची सत्यतेची पुष्टी केली नाही.