व्हॉट्स अॅप यूजर्स या व्हायरसपासून सावध राहा!

ही बातमी व्हॉट्स अॅप यूजर्सना धक्का देवू शकते. व्हॉट्स अॅप यूजर्सना सध्या एक व्हायरस खूप त्रास देतोय. जे लोक वेब व्हॉट्स अॅपचा वापर करतात त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची बाब आहे.

Updated: Sep 10, 2015, 10:24 AM IST
व्हॉट्स अॅप यूजर्स या व्हायरसपासून सावध राहा! title=

मुंबई: ही बातमी व्हॉट्स अॅप यूजर्सना धक्का देवू शकते. व्हॉट्स अॅप यूजर्सना सध्या एक व्हायरस खूप त्रास देतोय. जे लोक वेब व्हॉट्स अॅपचा वापर करतात त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची बाब आहे.

एका सिक्युरिटी फर्मच्या रिपोर्टनुसार हॅकर्स एक QR कोड कंप्युटरवर पाठवत आहेत. जो २०० मिलियनहून अधिक लोकांना नुकसान पोहोचवत आहे.

आणखी वाचा -  आता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड

सिक्युरिटी फर्मचं म्हणणं आहे की, मेलिसियसकार्ड नावाचा हा व्हायरस साधारणपणे वीकार्ड कॉन्टॅक्ट फॉर्मेटमध्ये आपल्या कंप्युटरवर पाठवला जातो. जसा आपण कंप्युटर सुरू करता तसंच कंप्युटरमध्ये व्हायरस बूट होतो आणि त्यासोबत वेगवेगळ्या फाईल्ससोबत इन्स्टॉल होतो. हा व्हायरस आपल्या व्हॉट्स अॅप वेबवरील डाटा चोरी करू शकतो आणि फाइल्सना नुकसान पोहोचवू शकतो.

याबाबत व्हॉट्स अॅपला माहिती देण्यात आलीय आणि व्हॉट्स अॅपनं आपला नवा अपडेट रोल आऊट केलाय. नव्या अपडेटमध्ये या व्हायरसची भीती नसेल. मात्र जर आपलं व्हॉट्स अॅप वेब अपडेट नसेल तर तुमचा डेटाचं या व्हायरसमुळे नुकसान होऊ शकतं. 

आणखी वाचा -  व्हॉट्स अॅपमधील हा नवा बदल तुम्ही पाहिला!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.