मुंबई: इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉस अॅपनं यूजर्ससाठी अपडेट्ससह नवं व्हर्जन लॉन्च केलंय. या नव्या अपडेटमध्ये तरुणांसाठी मीडल फिंगर इमोजीसह जुन्या व्हॉट्सअॅप इमोजीचं नवं ले-आऊट पण आहे.
# एवढंच नव्हे तर आता मॅसेज वाचल्यानंतर ते अनरिड किंवा आर्काइव्ह पण करता येऊ शकतं. त्यामुळं आपण मॅसेज वाचून ते समोरच्याला न वाचल्यासारखं वाटू शकतं. आपल्या वेळेनुसार याद्वारे आपण समोरच्याला रिप्लाय कधीही देऊ शकतो.
आणखी वाचा - सावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही
# जर आपण व्हॉट्सअॅपवर फ्री कॉलिंग करत असाल तर आपल्यासाठी एक नवं फीचर अॅड झालंय. यात कॉलिंग करतांना कमी डाटा खर्च होण्यासाठी मदत होईल. यासाठी आपण अॅपच्या चॅट्स आणि कॉल्स मेन्यूमध्ये खाली एक ऑप्शन दिसेल. 'लो डाटा यूसेस' (Low data usage). या ऑप्शनवर क्लिक करून आपण डेटा वाचवू शकता.
# आता आपण फक्त ग्रुपला म्यूट करू शकतो. मात्र आता व्हॉट्सअॅवर इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्टसुद्धा म्यूट करू शकाल. त्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट कस्टमाइजेशनचं ऑप्शन मिळेल.
आणखी वाचा - सुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!
# जर आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणता नंबर म्यूट करू इच्छिता. तर व्हॉट्सअॅपच्या म्यूट मेन्यूमध्ये जावू शकता. यासोबत म्यूटला स्लाइड करून आपल्याला 8 तास, 1 आठवडा किंवा 1 वर्षासाठी म्यूटचं ऑप्शन दिसेल.
# नव्या व्हर्जनमध्ये इमोजीवर टॅप केलं तर वेगवेगळे रंग दिसतील.
आणखी वाचा - पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल
# सोबतच आपलं व्हॉट्सअॅप हिंदी, इंग्रजीशिवाय उर्दू आणि बंगाली भाषांनाही सपोर्ट करेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.