जगातील सर्वात स्वस्त कम्पुटर, किंमत ६०० रुपये

हजारो रुपये खर्च करून कम्युटर घेणं हा कालबाह्य विषय होणार आहे. कारण आता अवघ्या ६०० रुपयांमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध होणार आहे. या कम्युटरला क्राउड फंडिंग वेबसाइड किकस्टार्टवर लिस्टेड करण्यात आलं आहे. 

Updated: May 12, 2015, 06:21 PM IST
जगातील सर्वात स्वस्त कम्पुटर, किंमत ६०० रुपये title=

मुंबई: हजारो रुपये खर्च करून कम्युटर घेणं हा कालबाह्य विषय होणार आहे. कारण आता अवघ्या ६०० रुपयांमध्ये कॉम्प्युटर उपलब्ध होणार आहे. या कम्युटरला क्राउड फंडिंग वेबसाइड किकस्टार्टवर लिस्टेड करण्यात आलं आहे. 

चिप 
चिप नावाचा हा कॉम्प्युटर डेव्ह बोर्ड आहे, मात्र कॉम्प्युटरमधील फीचर्स, फंक्शन्स इतर कॉम्प्युटरप्रमाणेच असणार आहेत. यामध्ये १ गीगाहर्ट्झ प्रोसेसर, ५१२ एमबीचा रॅम, ४ जीबी स्टोरेज आणि ब्लूटूथही आहे.

फुल डेस्क टॉपवर रन केला जाऊ शकतो
एका रिपोर्टनुसार, डेव्ह बोर्डसारखा दिसणाऱ्या या चिपवर पूर्ण लाइनक्स डेस्कटॉप रन केलं जाऊ शकतो. शिवाय नॉर्मल कॉम्प्युटरवर जे काही फंक्शन वापरले जातात, ते सर्व फंक्शन या कॉम्प्युटरकमध्ये वापरले जाऊ शकतात. यामध्ये पॉवर सोर्स लावून व्हिडिओ केबल जोडले जाऊ शकत.

स्वस्त असण्याचं कारण 
चिप एवढा स्वस्त आहे कारण याचा कोअर चायनीज टॅब्लेटपासून घेतले आहे. चिपमध्ये ऑलविनर SoC चा वापर केला आहे. याचा वापर अनेक डिव्हाईसमध्ये केला गेला आहे.
 
चिपने ३५ डॉलरमध्ये मिळणाऱ्या रास्पबेरी Pi2 ला किंमतीत मागे टाकले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.