मुंबई : शाओमीने मी-थ्री या स्मार्टफोनच्या मॉडेलचे 55 हजार हँडसेट अवघ्या 39 मिनिटात विकले गेले आहेत. हा एक विक्रम आहे.
शाओमीच्या पहिल्या फ्लॅश सेलमधील सर्व हँडसेटच्या विक्रीला 38 मिनिटे आणि 50 सेकंद लागले. यानंतरच्या फ्लॅश सेल्समध्ये कंपनीने अवघ्या 5 मिनिटे, दोन सेकंद असा वेळ घेतला. चौथा फ्लॅश सेल तर फक्त 2 मिनिटे 4 सेकंदातच झाला.
मोटोरोलालाही शाओमीने मागे टाकलं आहे. मोटोरोलाला मोटो-जी चे 10 लाख हँडसेट विकण्यासाठी 5 महिन्यांचा कालावधी लागला. म्हणजेच मोटोरोलाला 900 हॅण्डसेट विकायला जेवढा वेळ लागला, तेवढ्या वेळात शाओमीने 55 हजार हँडसेटची विक्री ऑनलाईन विक्री केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.