श्याओमीचा ६४ जीबीचा 'एमआय४' भारतात दाखल!

चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आज आपला आणखी एक स्मार्टफोन भारताच्या बाजारपेठेत उतरवलाय. ६४ जीबीचा 'एमआय४' हा श्याओमीचा नवीन स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. 

Updated: Feb 25, 2015, 03:46 PM IST
श्याओमीचा ६४ जीबीचा 'एमआय४' भारतात दाखल! title=

मुंबई : चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आज आपला आणखी एक स्मार्टफोन भारताच्या बाजारपेठेत उतरवलाय. ६४ जीबीचा 'एमआय४' हा श्याओमीचा नवीन स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. 

श्याओमीनं आपल्या या स्मार्टफोनलाही फ्लॅशसेलमध्येच विकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे, तुम्हाला हा फोन विकत घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी अगोदर रजिस्टर करावं लागेल. सध्या तरी या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन बंद आहेत. 

श्याओमी 'एमआय४'ची वैशिष्ट्ये...

  • स्क्रीन डिस्प्ले : पाच इंचाचा फूल एचडी डिस्प्ले, १९२० X १०८० पिक्सल रिझोल्युशन

  • ऑपरेटींग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ४.४.३ किटकॅट

  • प्रोसेसर : २.५ गिगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ सीरीज क्वॉडकोर

  • रॅम : ३ जीबी

  • इंटरनल मेमरी : १६ जीबी / ६४ जीबी

  • रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेर : ८ मेगापिक्सल

  • फ्रेम : स्टेनलेस स्टीलची फ्रेम

  • बॅटरी : ३०८० मेगाहर्टझ

  • नेटवर्क : थ्रीजी आणि फोर जी

आज हा स्मार्टफोन सायंकाळी ५ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होतोय. श्याओमीनं या स्मार्टफोनची किंमत २३,९९९ रुपये असेल. तर १६ जीबीच्या 'एमआय ४' या फोनची किंमत ४००० रुपयांपेक्षा जास्त आहे. 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.