नवी दिल्ली : तुमचा अॅन्ड्रॉईड फोन कुठे हरवला अथावा कुठे विसरून राहिला, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचा फोन शोधण्यासाठी गूगलचं सर्च इंजिन तुम्हाला मदत करणार आहे.
गूगलच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोणताही व्यक्ती डेस्कटॉपवर गूगल सर्चचा वापर करून हे काम करू शकतो. गूगल सर्चवर फक्त 'फाइंड माय फोन' असे टाईप करावे लागणार आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या फोनचं लोकेशन दिसणार आहे.
मात्र, हे करण्यासाठी तु्म्हाला तुमच्या फोनवर गूगल अॅपचा नवीन व्हर्जन डाऊनलोड करावा लागणार आहे. तसेच फोनमध्ये लोकेशन सर्व्हिस चालू असणंही गरजेचं आहे, ज्याच्या मदतीने गूगल तुमचा फोनचं लोकेशन शोधू शकेल.
तसेच, या अॅपच्या साहाय्याने तुम्ही तुमचा फोन हरवल्यास अथवा चोरी झाल्यास फोन लॉक करू शकता. तसेच फोनमधील डेटाही डिलिट करू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.