झी २४ तास वेब टीम, मुंबई
तुम्हाला जरी आश्चर्यचा धक्का बसणार असला तरी बॉलिवूडच्या खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खान आणि किरण राव यांच्या घरी लहान पाहुण्याचे नुकतंच आगमन झालं आहे. आमिर आणि किरणला मुलगा झाल्याचं वृत्त आहे. दिग्दर्शक कुणाल कोहलीने ट्विटरवर आमिर आणि किरणला खुप साऱ्या शुभेच्छ दिल्या आहेत. आमिर आणि किरण यांनी मुल होण्यासाठी सरोगेट मदरचे सहाय्य घेतलं. आमिर आणि किरण मुलाची खुप दिवसापासून प्रतिक्षा करत होते.
पण किरणच्या तब्ब्येतीच्या काही तक्रारी होत्या आणि २००९ साली तिचा गर्भपात झाला होता. त्यावेळेस जवळपास दोन महिने आमिरने ब्लॉग लिहिणं थांबवलं होतं. आमिरची मनस्थिती त्यामुळे ढासळली होती. आमिरला पहिली बायको रिना दत्तापासून जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत.