आमीर बनणार मुन्नाभाई?

Updated: Sep 23, 2011, 11:27 AM IST

ऐकलं का काही तुम्ही..नाही...काय सांगताय राव? अहो मुन्नाभाई एमबीबीएसच्या थर्ड सिक्वलमध्ये आमीर काम करणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोर धरतेय. संजूबाबाने फेमस केलेला हा रोल आता आमीर करतोय म्हटल्यावर त्यात बरेच काही नवीन येणार हे गृहीतच आहे. मिस्टर इंडियाला तर असेही समजले आहे की 'थ्री इडियट'च्या सेटवरच राजकुमार संतोषीने आमीरला ही गळ घातली होती. आमीरनेही भरल्या तोंडाने स्क्रिप्ट पाहू मग बोलू असे जाहीर आश्वासन दिले. आता मि.परफेक्टने ही स्क्रिप्ट पाहिली आहे अन् त्याचा मुन्नाभाईसाठी होकार आहे असे बॉलीवूडमध्ये पसरलेय. मुन्ना म्हणजे संजूबाबा असे समिकरण झालेले असताना त्यात आमीर येणार म्हणजे दोघांत लागली असे समजायचे पिल्लू मि.इंडियाने सोडले तर मग ही बातमी संजूबाबाला आधीच लागली होती म्हणूनच शाहरुखला त्याने जेवायला बोलावल्याचीही चर्चा आहे. आखीर दुश्मन का दुश्मन दोस्त ही होता है.

Tags: