शाहरूख खानचा आगामी बहुचर्चित सिनेमा डॉन २ वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. १९७८मध्ये अमिताभ बच्चन स्टारर डॉनच्या रिमेकची परवानगी नरिमन फिल्म्सने दिग्दर्शक फरहान अख्तरला दिली होती. पण या सिनेमाचा सिक्वल म्हणजेच डॉन २ची परवानगी त्यांनी दिली नव्हती.
तरीही डॉन 2 डिसेंबरमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नरीमन फिल्म्स या कंपनीने शाहरूख खान आणि फरहान आख्तर यांना यासंदर्भात लीगल नोटीस पाठवली आहे. रिमेकिंग राईट्सशिवाय डॉन २ प्रदर्शित करू देणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे शाहरूख खानला कॉपीराईटसाठी झगडावं लागणार असं दिसतंय.