भार्गव पारीख, www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आता त्यांच्या छोट्या भावानेच आव्हान दिलं आहे. रेशन दुकानात बारकोड व्यवस्था लागू झाल्यानं नाराज झालेल्या रेशन दुकानदारांनी प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
गुजरातमध्ये मोदी विरुद्ध मोदी असं युद्ध पेटलं आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचेच धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी मोदी सरकारच्या रेशन प्रणाली निर्णयाविरुद्ध आवाज उठवला आहे. सरकारची रेशन आणि केरोसीनची बारकोड व्यवस्था आपल्याला योग्य वाटत नसल्याचं रेशन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांच म्हणणं आहे. सरकारी रेशन आणि स्वस्त केरोसीनच्या विक्रीतली घोटाळा रोखण्यासाठी सरकारनं ऑनलाईन व्यवस्था सुरु केली आहे. मात्र दुकानदार प्रल्हाद मोदींचच समर्थन करत आहेत तर दुसरीकडे सामान्य माणूस मात्र सरकार आणि रेशन दुकानदार यांच्यात भरडला जात आहे.
आठ फेब्रुवारी पर्यंत निर्णय न झाल्यास लायसन्स परत देण्याची धमकी रेशन दुकानदारांनी दिली आहे. त्यामुळे सरकार मुख्यमंत्र्याच्याच छोट्या भावानं छेडलेल्या आंदोलनाला कसं उत्तर देते ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.