'राजा'ची फिरली 'प्रजा'

टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी दूरसंचारमंत्री ए.राजा हेच आहेत. त्यांनीच बड्या कंपनी प्रमुखांच्या संगनमतानं हा घोटाळा केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजा यांचे माजी सहकारी ए. आचार्य यांनी सीबीआय कोर्टात केला आहे.

Updated: Dec 20, 2011, 11:32 AM IST

झी २४ तास वेब टीम, तमिळनाडू

टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी दूरसंचारमंत्री ए.राजा हेच आहेत. त्यांनीच बड्या कंपनी प्रमुखांच्या संगनमतानं हा घोटाळा केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजा यांचे माजी सहकारी ए. आचार्य यांनी सीबीआय कोर्टात केला आहे.

स्वान टेलिकॉमचे शाहिद बलवा,विनोद गोयंका आणि यूनिटेकचे एमडी संजय चंद्रा हे यूपीए सरकारच्या सुरुवातीच्या काळापासून ए. राजा यांच्या अगदी जवळचे होते असा दावा त्यांनी केला आहे. पर्यावरणमंत्री असताना या कंपन्यांच्या अनेक प्रकल्पांना राजा यांनी मंजुरी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शिवाय डीमएकेच्या खासदार कनिमोळी आणि राजा सप्टेंबर ते डिसेंबर २००७ च्या काळात वारंवार संपर्कात राहायचे असा दावाही आचार्य यांनी केला आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा म्हणजे तामिळनाडूतल्या रेशन वितरण व्यवस्थेप्रमाणे असल्याची तुलनाही त्यांनी केली आहे.