www.24taas.com, नवी दिल्ली
हुंडाबळीसारख्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा देणं योग्य ठरत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय.
1996 मध्ये एका विवाहितेला जाळल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यादरम्यान सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलंय. हुंड्यासाठी एखाद्या महिलेला छळणं तिची अमानुषपणे हत्या करणं यासारख्या गुन्ह्यांना शिक्षा कमी करून पीडित महिलेला न्याय देता येत नाही, असं खंडपीठानं म्हटलंय. हुंडाबळीवरून शिक्षा भोगत असलेल्या कैलाश भटनागर आणि त्याच्या भावानं शिक्षा कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
आपण तरुण आहोत आणि आपली आई वृद्ध होत असल्याच्या कारणावरून शिक्षा कमी करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने या मागण्या फेटाळल्यात.