www.24taas.com, नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनानिमित्त ८१७ पोलीस पदकांची घोषणा राष्ट्रपतींनी केली. यासह सात पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक, ८७ जणांना पोलीस शौर्यपदक, ९३ जणांना राष्ट्रपतींचे अतिविशिष्ट सेवा पदक, तर ६३० जणांना विशेष सेवा पदक जाहीर झाले.
अतिविशिष्ट सेवा पदक मिळविणाऱ्यांत महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा आणि विशेष सेवा पदक मिळविणाऱ्यांत ४० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) कौशल कुमार पाठक, अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) अशोक धीवरे आणि कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपायुक्त हरविंदरकौर वरैच यांना सेवा पदक जाहीर झाले आहे.
यामध्ये गडचिरोली क्षेत्राचे उपमहासंचालक सुनील रामानंद, अमरावतीचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, दक्षिण मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवल बजाज, मुंबई एसीबी उपमहासंचालक नीकेत कौशिक, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे उपसंचालक डॉ. निखिल जयप्रकाश गुप्ता, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहासंचालक चिरंजीव आर. प्रसाद (जगदलपूर, छत्तीसगड-महाराष्ट्र क्षेत्र), नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक निळकंठ प्रतापराव म्हस्के, नवी मुंबईचे उपायुक्त रवींद्र प्रभाकरराव शेगावकर, वरळी (मुंबई) एससी-एसटी कमिशन पोलीस अधीक्षक राजाभाऊ एल. पवार, कल्याणच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत पापण्णा निंबाळकर, पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर शंकर जोशी, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे निरीक्षक गणपत विठोबा निकम, वाशिम येथील पोलीस निरीक्षक नंदकुमार शंकरराव काळे, पुण्यातील पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश) दत्तात्रय ज्ञानोबा पवार, ठाण्यातील नवापाडा भागातील वाहतूक शाखेचे निरीक्षक सलाउद्दीन जानमोहम्मद पठाण, ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश रामराव राऊत, नाशिक येथील भद्रकाली पोलीस ठाण्याचे कैलास दत्तात्रय घोडके, मुंबई एअरपोर्ट शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश बालचंद्र जोशी, पुणे सीआयडीचे पोलीस निरीक्षक दीपक भिकोबा हुम्बारे.
सोलापूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे निरीक्षक मिलिंद कालिदासराव पाटील, मुंबई सीआयडीचे निरीक्षक शशांक प्रभाकर सांडभोर, पुणे ग्रामीणचे निरीक्षक बलराज, शिवराज लांजिले, मुंबई एसआयडीच्या निरीक्षक श्रीमती नम्रता नितीन अलकनुरे, नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अशोक तुकारामजी देवतळे, पुणे आयुक्त कार्यालयातील उपनिरीक्षक रमेश विठ्ठलराव भोसले, दौंडचे (जि. पुणे) सहाय्यक उपनिरीक्षक मोहन राजाराम कदम, अमरावतीचे सहाय्यक उपनिरीक्षक हमिदखॉं सुभानखॉं पठाण, पुणे एसआरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम बबन नरके, मुंबईतील सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष यशवंत बेंदुगडे, नागपूर रेल्वेचे सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र प्रल्हाद सराफ, वरळी (मुंबई) वाहतूक मुख्यालयातील सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश रामचंद्र घोसाळकर, कणकवली (सिंधुदुर्ग) येथील सहाय्यक उपनिरीक्षक नंदा सोमा खोबारेकर.
मुंबईच्या बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक अशोक आबासाहेब वाघमारे, जळगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक सतीश सुखलाल जोशी, कोल्हापूरच्या चांदगड पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल एकनाथ गणपत देसाई, कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल शहाजी महादेवराव दुधभाते, डीसीबी मुंबईचे हेडकॉन्स्टेबल मारुती बाळू पुजारी, मुंबई सीआयडीचे हेडकॉन्स्टेबल अनिल महादेव सावंत, कोल्हापूर एलआयबी'चे हेडकॉन्स्टेबल अरविंद रामचंद्र पाटील, सिंधुदुर्ग मुख्यालयाचे हेडकॉन्स्टेबल उमाकांत राजाराम पालव आदींता समावेश आहे.