दिवाळीत रेल्वेप्रवाशांचे झाले हालहाल

दिवाळीचा सुट्टी आणि रेल्वे गाड्यांची गर्दी हे चित्र दरवेळेसच पाहता येतं, नेहमीप्रमाणे रेल्वेचा ढिसाळ कारभार यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेमध्ये गर्दी दिसून येत होती. दिवाळीनंतर पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

Updated: Nov 2, 2011, 07:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, परभणी 

 

दिवाळीचा सुट्टी आणि रेल्वे गाड्यांची गर्दी हे चित्र दरवेळेसच पाहता येतं, नेहमीप्रमाणे रेल्वेचा ढिसाळ कारभार यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेमध्ये गर्दी दिसून येत होती. दिवाळीनंतर पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या कुचकामी धोरणांमुळे प्रवाशांना कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. या प्रकरणी वेळोवेळी प्रवाशांनी मागणी करूनही प्रशासन मात्र कोणत्याच सुविधा देत नाही.

 

 

[caption id="attachment_4683" align="alignleft" width="300" caption="प्रवाशांचे हाल"][/caption]

२६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान, दिवाळी हा सण संपल्यानंतर प्रत्येक पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडीला गर्दी वाढत आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या चालू असल्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परंतु दिवाळी सणानंतर बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या पूर्णा येथून हिंगोली- वाशिम, अकोला- नांदेड, धर्माबाद- निजामाबाद, नांदेड- भोकर-आदिलाबाद, परभणी-परळी-लातूर, परभणी-जालना, औरंगाबाद-मनमाड या मार्गावर ज्या रेल्वेगाड्या धावतात त्या प्रत्येक गाडीला सध्या प्रचंड गर्दी आहे. गर्दीच्या दिवसात पॅसेंजर गाड्यांचे कोच वाढविण्यात आले नाहीत. यामुळे प्रवाशांना मेंढरासारखे कोंबलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागत आहे.
अनेक मोठय़ा रेल्वेस्थानकावर थांबण्यासाठी सावलीची सोय नाही. थांबलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे महिला व मुलांना अधिक त्रास होत आहे. धावत्या गाडीमध्ये अवैधरित्या पदार्थ विक्री करणार्‍यांची संख्या वाढली असून पाणी पाऊचची किंमत तीन पटीने वसूल केली जात आहे. याबाबीकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी पॅसेंजर गाड्यांना कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने रेल्वेगाड्यांमधून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना यामुळे त्रास होत आहे. संबंधित विभागांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.