पोस्टाने पोलीस बनण्याची संधी हुकवली

औरंगाबादमध्ये पोस्ट ऑफीसच्या चुकीमुळे एका तरुणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. पोस्टाच्या दिरंगाईमुळं दिल्ली पोलिसांनी पाठवलेलं कॉल लेटर या तरुणाला महिनाभर उशिरा मिळालं.

Updated: May 21, 2012, 11:43 PM IST

 www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये पोस्ट ऑफीसच्या चुकीमुळे एका तरुणाचं पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं आहे. पोस्टाच्या दिरंगाईमुळं दिल्ली पोलिसांनी पाठवलेलं कॉल लेटर या तरुणाला महिनाभर उशिरा मिळालं. त्यामुळं त्याची पोलीस होण्याची संधी हुकली आहे.  औरंगाबादचा नितीन अंभोरे. पोलीस खात्यात भरती होण्याचं स्वप्न नितीन उराशी बाळगून होता आणि त्यासाठी त्याने सर्वतोपरी तयारीही केली होती.

 

दिल्ली पोलीस भरतीची लेखी परिक्षाही तो उत्तीर्ण झाला. त्याला शारिरीक चाचण्यांसाठी नवी दिल्लीला बोलावण्यात आल्याचं पत्र दिल्ली पोलिसांनी पाठवलं परंतू पोस्टाच्या भोंगळ कारभारामुळं ते नितीनपर्यंत पोहचलच नाही. स्पीड पोस्टने पाठवलेलं पत्र तीन दिवसांत संबंधित पत्त्यावर पोहचायला हवं. औरंगाबादच्या टपाल खात्यानं महिनाभरानं हे पत्र नितीनपर्यंत पोहचवल्यानं नितीनचं पोलीस बनवण्याचं स्वप्न भंगलं आहे.

 

मुलाखतीचं लेटर असो, कि कुणाच्या नोकरीचं किंवा लग्नाच्या आमंत्रणाच्या पत्रिका कधीच वेळेवर पाठवलं जात नाही. टपाल विभागाची दिरंगाई कायम समोर आली आहे. नितीनच्या प्रकाराबाबतही टपाल अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रीया देण्याचं टाळलं आहे.