www.24taas.com, मालेगाव
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. पण महाराष्ट्रात का? महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का? असा सणसणीत सवाल राज यांनी केला आहे.
नीतिश कुमार यांनी बिहारमध्ये काही चांगली कामे केली आहेत. मात्र, त्यांनी इथे येऊन अशी नौटंकी करू नये, असेही राज ठाकरे यांनी खडसावले. बिहार दिन २३ मार्चला आहे पण हे साजरे करणार १५ एप्रिल, काय गरज काय आहे? नीतिश कुमार असे भिकार राजकारण करणार असे वाटले नव्हते, असेही राज ठाकरे यांनी खडसावले.
बिहार राज्याला १०० वर्ष पूर्ण झाली, आम्हांला आनंद आहे. पण महाराष्ट्राला ५० वर्ष झाले आम्ही गेलो होतो का तिथे गेलो का? दिल्ली, मुंबई आणि कोलकत्त्यात बिहार दिन साजरे करणार असल्याचे म्हणत आहेत. मग चेन्नई, गुजरातमध्ये काही नाही, असेही राज ठाकरे यांनी यावेळी विचारले.
आज महाराष्ट्रात बिहार दिन साजरा झाला याचं काही नाही , मग उत्तर प्रदेशवाले उठतील, मग इतर प्रदेशातील येतील. पण महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का? असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
शहरांची वाट लावण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. माझ्या हातात महापालिका नाही तर महाराष्ट्र हातात द्या. मी फालतू आश्वासने देणार नाही. मालेगावात पाकिस्तान, बांग्लादेशमधून येणारे लोक मराठी माणसांच्या नावाने राहतात. काय चालले आहे. आज मालेगाव शहर हे दहशतवाद्यांचा अड्डा झाले असल्याचे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले.
मालेगाव पालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत राज बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शहरं दिवसेंदिवस खराब होत चालली आहेत. मालेगावचे नाव खराब होत आहे . मुस्लिम नेत्यांनी मालेगावातील जनतेला फसवले आहे. मराठी मुस्लिम पट्ट्यात इतर प्रांतातील लोक येत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचे अड्डे बनविण्याचे शहर मालेगाव झाले आहे. निवडणुकांचा धंदा सुरू झाला आहे. दुसरीकडे लक्ष नाही. अशा निवडणुका मला लढायच्या नाहीत.
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="82102"]