विषबाधेमुळे मोर, तितर मृत्यूमुखी

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावात विषबाधेमुळं 14 मोर आणि 15 तितरांचा मृत्यू झालाय. शेतातील धान्य खाल्ल्यामुळं पक्षांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

Updated: Jul 9, 2012, 11:00 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावात विषबाधेमुळं 14 मोर आणि 15 तितरांचा मृत्यू झालाय. शेतातील धान्य खाल्ल्यामुळं पक्षांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

पाचोड भागात मोठ्या प्रमाणात मोर आढळतात. या मोरांचा परिसरातल्या शेत शिवारात मुक्त वावर असतो. त्यामुळं राष्ट्रीय पक्षी असलेला मोरांच्या जीवाला कायम धोका असतो. शेतात पेरलेलं रासायनिक प्रक्रिया केलेलं बियाणं खाल्ल्यानंतर पक्षांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी आणि दोन मुलांना अटक करण्यात आलीये. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.