www.24taas.com, अहमदनगर
उद्योगमंत्री नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे ते अहमदनगर इथे बोलत होते. नारायण राणेंचे मानसिक संतूलन बिघाडल्याने ते असे बोलतात अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली. नारायण राणे यांनी काल कुडाळमध्ये घेतलेल्या वस्त्रहरण सभेत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. नारायण राणेंच्या टीकेला सविस्तर उत्तर देणार असल्याचा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
नारायण राणेंचे निकटवर्तीय शंकर कांबळी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्याआधी सावंतवाडीचे आमदार शिवराम दळवी, मालवणचे उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्यापाठोपाठ माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांनी सभा घेऊन राणेंना उघड आव्हान दिलं होतं.