नीरजचे स्वप्न, पंकज करणार पूर्ण

नीरजचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचं स्वप्न अधुरं राहीलंय. नीरजला अपघात झाल्याने अधुरे राहिलेले स्वप्न आता त्याचा जुळा भाऊ पंकज पूर्ण करणार आहे. पंकजने आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसून मेहनतीला सुरुवात केलीय.

Updated: Nov 10, 2011, 11:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, अंबरनाथ

 

रांची येथून एथेलेटिक स्पर्धा खेळून परतणाऱ्या नीरज सिंगला रेल्वे अपघातात पाय गमवावा लागला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व  करण्याचे नीरजचे स्वप्न होते. पण, नीरजला अपघात झाल्याने अधुरे राहिलेले स्वप्न आता त्याचा जुळा भाऊ पंकज पूर्ण करणार आहे. पंकजने आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसून मेहनतीला सुरुवात केलीय.

 

रांची येथून एथेलेटिक स्पर्धा खेळून परतताना नीरज सिंगला रेल्वे अपघातात आपला पाय गमवावा लागला..त्यामुळं  नीरजचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचं स्वप्न अधुरं राहीलंय..पण आता त्याचे स्वप्न पूर्ण करणाराय त्याचा जुळा भाऊ पंकज...आपल्या भावाबरोबर तबेल्यात काम करण्याबरोबरच पंकजही हॅमर थ्रोचा सराव करत असे. आपल्या  अपंगत्व आलेल्या भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकज प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.पंकजच्या या स्वप्नात नीरजला घडविणारे त्याचे प्रशिक्षक विलास गायकर हे सुध्दा मदत करतायत. पंकजनं ह्यामर थ्रो आणि भाला फेकमध्ये नैपुण्य मिळवलंय..नीरजप्रमाणेच पंकजनही राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यामुळंच नीरजचे अधुरे स्वप्न त्याचा भाऊ पंकज पूर्ण करेल अशी आशा बाळगूया.