www.24taas.com, मुंबई
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. नगर परिषद पराभवाचे वैफल्य आल्यानेच राणे, अशी टीका करत असल्याचं पिचड म्हणाले. राणेंच्या वक्तव्याचा आघाडीवर कोणताही परीणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. झी २४ तासच्या प्रतिनिधीनं नांदेडमध्ये त्यांच्याशी संवाद साधला.
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगतयं. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
कुडाळच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्या दिवंगत वडिलांबाबत, नारायण राणेंनी टीका केली होती. याविरोधात राणेंना कोर्टात खेचणार असल्याचं केसरकरांनी सांगितलंय. राणेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. त्यामुळे राणेंची आता डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद वाढण्याची शक्यता आहे.