www.24taas.com, ठाणे
ठाणे झेडपीतही मनसेनं शिवसेनेला दणका दिला आहे. त्यामुळं ठाणे झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपादाचा मार्ग सुकर झाला आहे.
66 सदस्यांच्या झेडपीत बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीकडं 27 सदस्य आहेत. तर काँग्रेसचा एक आणि मनसेचे दोन असे 30 सदस्यसंख्या होते. गेल्यावेळी कम्युनिस्ट आणि बहुजन विकास आघाडीही राष्ट्रवादीसोबत होते. कम्युनिस्टांचे 4 आणि बहुजन विकास आघाडीचे 3 सदस्य राष्ट्रवादीला मदत करु शकतात. त्यामुळं राष्ट्रवादीचं संख्याबळ 37 वर जाऊ शकतं. राष्ट्रवादीचा अध्यक्ष सहजपणे निवडून येऊ शकतो.
तसेच कम्युनिस्ट किंवा बहजुन विकास आघाडी यांचे सदस्य तटस्थ राहिले तरीही राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून येऊ शकतो. झेडपीचं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. आघाडीकडून अंबरनाथ तालुक्यातल्या सारिका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर युतीकडून कल्याण ग्रामिणच्या सुमन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.