चोर चोरी कऱण्यासाठी कोणती पध्दत वापरणार याचा काही नेम नाही. नागपूरमधील ही घटना आहे. चोरी कऱण्यासाठी ही टोळी आलिशान कारमधून परिसरांची पाहणी करत असे. परिसराची पाहणी करत असतानाच ते एखादं घर निवडत असत. मग ठरवलेल्या घरांवर पाळत ठेऊन,त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींबद्दल ते माहिती काढायचे. ही माहिती मिळवल्यानंतर या टोळीच खरं काम सुरु व्हायचं. आशाच पध्दतीन या टोळीने नागपूर मधील वेगवेगळ्या भागात चोरी करुन नागपुरात दहशतीच वातावरण निर्माण केलं होत. मात्र या वेळी या टोळीने चोरी केली खरी पण त्यांच्या हाती रोख रक्कम पडण्याऐवजी पडल्या त्या बेड्या...
नागपूर पोलिसांनी गजाआड केलेल्या टोळीची ही कार्यपध्दती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नागपूर येथील धंतोली पोलिसांनी हा चांदीच्या दागिन्यांचा साठा या रोशन समुद्रे,उमेश कुमटे,प्रफुल्ल मुळे,सूरज केराम आणि प्रविण किचर या चोरट्यांन कडून जप्त केला आहे. नागपूर पोलिसांनी या हाय प्रोफाईल चोरांच्या टोळीला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे.
या वेळीही या टोळीने नागपूरीतील धंनतोली परिसरातील एका घराला लक्ष्य बनवलं होत. चोरी करण्या आधी या टोळीने ठरल्याप्रमाणे घरातील सर्व लोकांबद्दलची माहिती काढली होती. त्यानंतर या टोळीने घटनेच्या दिवशी घरातील वॉचमनला दारु पाजून बेशुद्ध केलं आणि घरात प्रवेश मिळवला घरात प्रवेश मिळताच या चोरट्यानी घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात साफ केला.
चोरी केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल होताच पोलिसांनी या चोरट्यांना हूडकुन काढत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक टोळीकडून चोरीतील चांदीची सर्व दागिने जप्त केले आहेत. पोलीस अटक आरोपींकडे या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.