चिमुरड्यांना कोंडणारी मुजोर शाळा

जळगाव शहरातल्या आदर्शनगरातली रुस्तुमजी स्कूल कधी शाळेतल्या शिक्षिकेचं अनोखं आंदोलन तर कधी पालकांच्या तक्रारींमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा या शाळेनं नवा प्रताप केला.

Updated: Feb 19, 2012, 05:59 PM IST

www.24taas.com, विकास भदाणे, जळगाव

जळगाव शहरातल्या आदर्शनगरातली रुस्तुमजी स्कूल कधी शाळेतल्या शिक्षिकेचं अनोखं आंदोलन तर कधी पालकांच्या तक्रारींमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा या शाळेनं नवा प्रताप केला.

मात्र सध्याचं प्रकरण गंभीर आणि तितकचं संतापजनक आहे. शुल्क बाकी असल्यामुळे नर्सरीतल्या चार ते पाच चिमुरड्यांना कोंडुन ठेवण्याचा प्रकार या शाळेत घडला आहे. दुस-या शैक्षणिक सत्राची फी बाकी होती. त्यामुळे चिमुरड्यांना शाळेत कोंडुन ठेवण्यात आलं होतं.

हा प्रकार कळताच संतापलेल्या पालकांनी शाळेविरुद्ध जिल्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शाळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एव्हढं सगळं होऊन शाळेच्या प्राचार्यांचं उत्तर धक्कादायक होतं. फी वेळेत भरली असती तर ही वेळ आली नसती, असं मुजोर उत्तर त्यांनी दिलं आहे.

[jwplayer mediaid="51362"]

[jwplayer mediaid="51362"]