नाशिकचा महापौर हा मनसेचाच - राज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये आपल्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वपूर्ण खुलासे देखील केले. 'नाशिकचा महापौर हा मनसेचाच असणार'. असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Updated: Feb 19, 2012, 12:10 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये आपल्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वपूर्ण खुलासे देखील केले. 'नाशिकचा महापौर हा मनसेचाच असणार'. असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

 नाशिक महापालिकेचा निकाल लागल्यानंतर मनसे हा नाशिक मधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अनपेक्षितपणे समोर आला आहे. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीत तब्बल ४० जागेवर मनसे नगरसेवक निवडून आल्याने आता महापौर पदाचा आणि सत्तेच्या चाव्या सुद्धा मनसेकडेच आल्या आहेत.

 

नाशिकचा महापौर हा मनसेचा असणार - राज

राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की 'नाशिकचा महापौर हा मनसेचा असणार', पण 'सत्तेसाठी अजूनही कोणाशी चर्चा सुरू केलेली नाही', 'ह्या क्षणाला राजकीय समीकरणांवर काहीही बोलणार नाही', 'पण आघाडीचे काही नेते संपर्कात आहेत'. असं म्हणतं राज यांनी सत्तेसाठी पूर्ण सेंटीग चालू असल्याचे एकप्रकारे स्पष्ट केलं आहे.

 

मलाही लॉबिंग करता येते - राज

'प्रत्येक निवडणूक काहीनां काही शिकवते', 'ह्या निवडणुकीतून शिकलो की उद्दामपणा करू नये', 'पैशाचा माज करू नये'. असं म्हणतं राज ठाकरे यांनी  काहीही सरळ न बोलता त्यांच्या विरोधकांना योग्य तो सल्ला दिला. तर 'मी कुठेही लॉबिंग करत नाही आहे, पण मलाही लॉबिंग करता येते'. असं म्हणत राज यांनी सेनेला इशारा दिला आहे.

 

नाशिककरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - राज

राज यांना एकहाती सत्ता जरी मिळाली नसली तरी मनसे महापौर निश्चित असल्याने राज यांनी नाशिककरांना विश्वास दिला आहे की, 'नाशिक महापालिकेचे असं काम करून दाखविन की सगळ्यांना याची दखल घ्यावी लागेल', 'महापालिका निवडणूक प्रचाराला वेळ कमी पडला, नाहीतर एक हाती सत्ता नक्कीच मिळाली असती', तर गोदापार्क आणखी चागलं होणार, ते माझं ड्रिम प्रोजेक्ट आहे. नाशिककरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

 

असं म्हणतं राज यांनी नाशिककरांना आपलसं करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नाशिक मनपा सत्तेचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यापुढे मनसे यापुढे भुमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.