पुणे कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातली व्यवस्था कडक करण्यात येते आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Updated: Jan 9, 2012, 09:10 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातली व्यवस्था कडक करण्यात येते आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोर्ट दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर ही खबरदारी घेण्यात येते आहे.

 

पुण्यातलं छाबड हाऊस, ओशो आश्रम, दगडूशेठ गणपती, NDA आणि DRDO ही ठिकाणं आधीपासूनच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यातच शिवाजीनगर कोर्टाची भर पडली आहे. दिल्ली हायकोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटचं उदाहरण ताजं असल्यानं विशेष काळजी घेण्यात येते .

 

शिवाजीनगर कोर्टात रोज पंधरा हजारांहून अधिक लोक येतात. त्यात अनेक आरोपींचाही समावेश असतो. शिवाजीनगर कोर्टात याआधीही आरोपींमधल्या वादाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आता सुरक्षेसाठी कोर्टाच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतात. जर्मन बेकरीत झालेल्या ब़ॉम्बस्फोटांनंतर दहशतवादी पुण्याला लक्ष करत असल्याचं उघड झालं. आता गुप्तचरसंस्थांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेत कुठल्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत.